कोल्हापूरमध्ये उसाचा ट्रॅक्टर पेट्रोलचे बोळे टाकून पेटवला, काय घडलं?
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेमरस साखर कारखान्याकडे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर वर पेट्रोलचे पेटते बोळे फेकले, यावेळी ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात आग लागून जळून खाक झाला, ही घटना कर्नाटक बेळगाव सीमा भागातील बोडकेनट्टी या गावाजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजता घडली आहे.