संत तुकाराम महाराज यांच्याकडे मनोज जरांगे पाटील यांनी काय मागितलं?
मनोज जरांगे हे पुणे दौऱ्यावर होते, देहूत मराठा बांधवांशी संवाद साधल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाऊन तुकोबा चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं, या सरकारला आरक्षण देण्यासंबंधी सद्बुद्धी द्यावी अस साकडं तुकोबा चरणी घातल्याचे यावेळी जरांगे यांनी म्हटलंय.