कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर काय घडतंय?
राज्यभरात मराठा आंदोलन उग्र होत असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आंदोलकांकडून नेत्यांच्या घराबाहेर दगडफेक आणि जाळपोळही करण्यात येत आहे. यामुळे नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोल्हापुरातील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेरही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.