जेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारसाठी किल्ला लढवतात... विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी २३ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केलेली चार विधानं खूप चर्चेत आहेत. त्यावरून पवारांनी सरकारची कोंडी करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बाजू लावून धरल्याचं म्हटलं जातंय.