अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यात राजकीय संघर्ष उफाळून आलाय. याची सुरूवात झाली ती दहीहंडी कार्यक्रमात केलेल्या एका टीकेपासून... नवनीत राणांनी ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले. राणांनी केलेल्या आरोपांनंतर यशोमती ठाकूरांचाही पारा चढला. दोन्ही नेत्यांमधील वाद अमरावती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये आता नेमकं काय झालंय, हेच आपण जाणून घेऊयात..