शिवसेनेचा यंदाचा मेळावा परवानगीच्या फेऱ्यात अडकला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टींना आव्हान देत आहेत. त्याच पद्धतीनं त्यांनी दसरा मेळाव्यावरतीही आपला दावा केला आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही गटांनी अर्ज केलेला आहे. त्यामुळे महापालिका कोणाला परवानगी देणार हे निश्चित नव्हते. म्हणून ही परवानगी लवकरात लवकर मिळावी यासाठी शिवसेनेने काल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदानासाठी बीएमसीने शिवसेनेला परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सांगून ही परवानगी नाकारली आहे. शिंदे गट आणि शिवसेना दोघांनाही परवानगी नाकारली आहे.