Bhaskar Jadhav म्हणाले ‘...तर मी राजकारण सोडून देणार’ Ramdas Kadam यांना खुलं आव्हान|Shiv Sena | BJP

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर आज शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी घासत असून, वरून बाळासाहेब बघत असतील, तर तेही म्हणत असतील की माझा मुलगा (उद्धव ठाकरे) शरद पवार आणि सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला, अशा शब्दात रामदास कदमांनी शरसंधान साधलं. आदित्य ठाकरेंसोबतच रश्मी ठाकरेंवरही रामदास कदमांनी हल्ला चढवला. शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावर एकेरी शब्दांत टीका केली. रामदास कदमांच्या याच टीकेनंतर भास्करराव जाधव यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.