नागपूर जिल्हा परिषदेच्या खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक घटना घडली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना भूलचे इंजेक्शन देऊन चहा न मिळाल्याने नाराज झालेल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता पळ काढल्याने एकच खळबळ उडाली.