मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी ऐनवेळी आपले सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केले. आणि शिंदेंनी सहकुटुंब हेलिकॉप्टरने शिर्डी गाठलं. पण साईदर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अचानक वाट बदलत एक नवं मंदिर गाठलं आणि त्यामुळेच आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात काय घडलं, साई दर्शनानंतर रस्ता बदलून मुख्यमंत्री कुठे गेले, त्यांच्यासोबत कोण कोण होतं, तसंच रस्ता बदलेल्या ठिकाणी महात्म्य काय तेच बघणार आहोत.