राष्ट्रवादीत दोन गट पडले. अनेक नेते सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटात सामील झाले. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. दुसरीकडे दोन्ही गटातील नेत्यांच्या भेटीगाठी होताहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेमकं काय चाललंय असा प्रश्न सातत्याने डोकं वर काढतो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे शरद पवार गटातील एका खासदाराने अजित पवार गटातील कॅबिनेट मंत्र्याची भेट घेतली. हे खासदार आहेत अमोल कोल्हे तर मंत्री आहेत दिलीप वळसे पाटील. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून घेऊया...