ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरसकट मराठा आरक्षणाला विरोध
सरसकट मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला. आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील भुजबळ यांना समर्थन देत ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला.