मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा सुरू आहे. यामध्ये सातारा येथेही जरांगे पाटील यांची 18 नोव्हेंबरला जाहीर सभा होत आहे. परंतु सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या पोवई नाक्यावरील शिवतीर्थ परिसरातील सभेला विरोध होत आहे.