राहुल गांधींची भारत जोडो यात्रा १४ दिवस महाराष्ट्रात होती. भारत जोडण्यासाठी आपण यात्रेवर निघालोय, असं राहुल गांधी सांगत असले, तरी यात्रेचा एक मूळ उद्देश काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती करणं हाही असल्याचं वेळोवेळी समोर आलंय. महाराष्ट्रात तर आपल्याला आतापर्यंत ज्या राज्यांत गेलीय, तिथल्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याचा दावा राहुल गांधींना पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्राच्या राजकीय चर्चाविश्वात या यात्रेबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात बोललं जातंय. पण या यात्रेनं काय साधलं, याचा खरंच काँग्रेसला फायदा होणार का, आणि भाजपसाठी काळजी करण्यासारखी काही गोष्ट आहे का, हेच आपण ५ मुद्यांतून समजून घेणार आहोत.