आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर आज शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी घासत असून, वरून बाळासाहेब बघत असतील, तर तेही म्हणत असतील की माझा मुलगा (उद्धव ठाकरे) शरद पवार आणि सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला, अशा शब्दात रामदास कदमांनी शरसंधान साधलं. कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादाला लागले आहेत, असं सांगतानाच महाविकास आघाडीसंदर्भात झालेल्या बैठकीतला किस्साही रामदास कदमांनी ऐकवला.