युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिव-संवाद यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात पार पडली. यावेळी दापोलीतील सभेत आदित्य ठाकरे आमदार योगेश कदम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील सर्वच आमदारांवर जोरदार टीका केली. या टीकेचा समाचार घेत रामदास भाई कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावरही जोरदार टीका केली. कोकणातला शिंदे गटाचा पहिला मेळावा दापोलीत रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात झाला.