Sanjay Pawar यांचा सवाल, Bhagat Singh Koshyari यांनी दैवताचा अपमान केला, तरी शिवप्रेमी गप्प का?| BJP

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात उमटले आहेत. त्यावर भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीसांनी भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांची पाठराखण केल्याचा आरोप होतोय. संजय राऊतांनी यावरूनच फडणवीसांवर प्रहार केलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. दोघांनी केलेल्या विधानांमुळे भाजप टीकेचं धनी ठरलंय. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली.