Sanjay Raut: Rahul Gandhi यांनी सावरकर वादानंतर कशासाठी फोन केला?| Bharat Jodo| BhagatSingh Koshyari

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. महाराष्ट्रात १४ दिवसांच्या मुक्कामानंतर ही यात्रा मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाली. पण महाराष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याबद्दल राहुल गांधींनी केलेलं विधान वादात सापडलं. यावरून भाजपनेच नाही, तर ठाकरे गटानंही राहुल गांधीवर टीका केली. याच टीकेनंतर रविवारी २० नोव्हेंबर रोजी राहुल गांधींनी थेट शिवसेना खासदार संजय राऊतांना कॉल केला. सावरकर वाद तापलेला असतानाच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून संजय राऊतांना कॉल का केला?