Sharad Pawar On ED : ‘चौकशी करण्याला माझी ना नाही, मी घाबरतही नाही, पण माझी एक अट...’|Jitendra Awhad

शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आलेल्या पत्राचाळ भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आलीये. भाजपकडून पत्राचाळ प्रकरणात नाव घेण्यात आल्यानंतर त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलंय. पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचीही चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यांनी केलीये. भाजपकडून करण्यात आलेल्या या मागणीवर शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीये.