Sushma Andhare: ‘Ramdas Kadam खुल्या मैदानात या समोरासमोर बोलू..’ | Bhaskar Jadhav | Shiv Sena | BJP

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपासून दूर गेलेले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या रामदास कदम यांनी दापोलीतल्या सभेत मातोश्रीवर हल्ला चढवला. आदित्य ठाकरेंपासून ते भास्कर जाधवांपर्यंत सर्वांवर रामदास कदमांनी पलटवार केला. २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदाबद्दल झालेल्या घटनाक्रमांबद्दल रामदास कदमांनी काही दावे केले. यात रश्मी ठाकरेंचा नामोल्लेख टाळत कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिव संवाद यात्रेला योगेश कदमांनी दापोलीत सभा घेऊन प्रत्युत्तर दिलं. याच सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदावरून गंभीर आरोप केलेत. रामदास कदमांच्या टीकेला शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं.