मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी आले असताना त्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातून अनेक नागरिक आले होते. मराठा समाजातील काही नागरिकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आम्हाला कुणबीमधून आरक्षण नको असा सूर या भेटीमध्ये दिसून आला.