17 सप्टेंबरला सगळ्यांचं लक्ष मराठवाड्याकडे असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला होणार आहे आणि दुसरं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शहराच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाहांच्या या दौऱ्याकडे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बघितलं जात आहे. अमित शाह छत्रपती संभाजीनगरात का येणार आहेत? हेच आपण जाणून घेऊयात.