बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी नेत्यांची घरे आणि अनेक शासकीय कार्यालय देखील पेटवून दिली. या पार्श्वभूमिवर सध्या बीड जिल्ह्यात संचारबंदी लागून कऱण्यात आली आहे. या घटनेत संतापलेल्या आंदोलकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरालाही पेटवून दिलं. यात क्षीरसागर यांच्या घराखाली उभ्या असलेल्या ८ चारचाकी वाहनं जळून खाक झाल्या आहेत. यासोबतच ऑफीसमध्ये असणार महत्त्वाची कागदपत्रंही जळून खाक झाली आहेत.