शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतल्या आझाद मैदानावर पार पडला. दसरा मेळाव्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर टीकेच्या तोफा डागल्या. शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठावर अनेकांची भाषणं झाली. यात शिंदेंच्या मेळाव्यात जोरदार भाषण करणाऱ्या ज्योती वाघमारे यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे ज्योती वाघमारे कोण आहेत आणि त्यांची चर्चा नेमकी का होतीये हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.