शरद पवारांना बारामतीत टक्कर देण्यासाठी भाजप राहुल गांधींविरोधातला पॅटर्न पवारांच्या बारामतीसाठी वापरणार? काय आहे अमेठी पॅटर्न?

अमेठी काँग्रेसला बालेकिल्ला...पण एखाद्या पक्षाचा-व्यक्तीचा बालेकिल्ला आहे म्हणून काहीही करा तो आयुष्यभर, पिढ्यान् पिढ्या त्यांच्याकडेच राहतो का? तर अलिकडचंच त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण असेल ते म्हणजे अमेठी. याच अमेठीच्या खासदार स्मृती इराणी जेव्हा महाराष्ट्रात आलेल्या तेव्हा म्हणालेल्या ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती. समझने वाले को इशारा काफी है. अमेठी जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता, संजय गांधी लढले, राजीव गांधी-सोनिया गांधी आणि नंतर राहुल गांधींनीही अमेठी गड कायम राखला. Dr Sanjay Sinh won Amethi on a BJP ticket in 1998. २०१४ मध्ये भाजपच्या स्मृती इराणींनी राहुल गांधींना आव्हान दिलं पण त्या पराभूत झाल्या, २०१९ ला आव्हान दिलं आणि काँग्रेसचा गड भाजपने काबीज केला. आता हेच लक्ष्य भाजपचं बारामतीसाठी आहे. स्टोरी सेम, जसा अमेठी काँग्रेससाठी तसा बारामती पवारांसाठी. पवारांना शह देण्यासाठी भाजपने प्रयत्न अनेक केले, पण अजूनही बारामतीत त्यांना यश आलेलं नाही. पण आता मात्र भाजपने मिशन ४५ ठेवलंय. बारामती त्यातलं टार्गेट असणारच. आता यासाठी अमेठी पॅटर्न भाजप बारामतीत राबवणार का? काय होता अमेठी पॅटर्न? समजून घेऊयात.