राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली आणि राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. दादांनी बंड केल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवारांसोबत अनेक आमदार, नेते, पदाधिकारी गेले. यानंतर शरद पवार पक्षबांधणीच्या कामासाठी खुद्द मैदानात उतरले. मोर्चेबांधणीसाठी त्यांनी राज्यभरात दौरे करायला सुरूवात केली. त्यातच आता शरद पवार काँग्रेसच्या सत्यशील शेरकर यांना भेटणार आहेत. यामुळे अनेक चर्चाना उधाण आलंय. नेमकी ही भेट कशासाठी होणार आहे? हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..